सावधान! प्रथम ऑनलाइन मैत्री, नंतर न्यूड फोटो; नागपूरसह देशभरात टोळी सक्रिय
सावधान! प्रथम ऑनलाइन मैत्री, नंतर न्यूड फोटो; नागपूरसह देशभरात टोळी सक्रियSaam Tv

सावधान! प्रथम ऑनलाइन मैत्री, नंतर न्यूड फोटो; नागपूरसह देशभरात टोळी सक्रिय

नागपूरात एकाला अटक, टोळीचा शोध सुरू

नागपूर - सोशल मिडिया Social Media प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणांशी मैत्री, नंतर न्युड फोटोची मागणी आणि न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी Ransom मागणारी टोळी देशभर सक्रिय आहे. ही टोळी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूरात Nagpur अशाच एका प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी Police अटक केली आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

हे देखील पहा -

सोशल मीडियावर तरुणांशी मैत्री करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि नंतर न्युड फोटो मागून फोटो मिळाल्यावर खंडणी मागायचे अशा टोळ्या सध्या देशभरात सक्रिय आहे. नागपूरात देखील आता स्थानिक गुन्हेगार हाच फंडा वापरून तरुणांना फसवत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. अशाच प्रकरणात एका आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

सावधान! प्रथम ऑनलाइन मैत्री, नंतर न्यूड फोटो; नागपूरसह देशभरात टोळी सक्रिय
अंबरनाथमध्ये तरुणाची खदानीत उडी मारून आत्महत्या

रौनक वैद्य असे या आरोपीचे नाव आहे. टोळीतील मुलींच्या माध्यमातून सोशल मीडियावर तरुणांना प्रेमाचे जाळं टाकायचे आणि नंतर न्युड फोटो मागवून खंडणी मागायची हा फंडा वापरत असल्याचे पुढे आले आहे. एका तरुणाची फसवणूक झाल्यावर सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या आरोपीला अटक करण्यात आली.

आधी प्रेमाचं जाळं, न्युड फोटो, आणि मग खंडणी’ गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. यात देश विदेशातील सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहे. आता नागपूरातील स्थानिक आरोपींच्या टोळ्याही हिच मोडस ॲापरेंटी वापरुन गुन्हे करायला लागले आहे. हा सेक्सटॅार्शनचा प्रकार असून पोलिसांसमोर या गुन्हेगारीचं नवं चॅलेंज आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com