School Reopen: अमरावती जिल्ह्यातील 1ली ते चौथीच्या शाळा सुरु
School Reopen: अमरावती जिल्ह्यातील 1ली ते चौथीच्या शाळा सुरु - Arun Joshi, Amravati

School Reopen: अमरावती जिल्ह्यातील 1ली ते चौथीच्या शाळा सुरु

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पोझीटीव्हीटी चा दर कमी होताच अमरावती जिल्ह्यातील पहिली ते चवथी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा आज पासून सुरु करण्यांत आलेल्या आहेत

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पोझीटीव्हीटी चा दर कमी होताच अमरावती जिल्ह्यातील पहिली ते चवथी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळां आज पासून सुरु करण्यांत आलेल्या आहेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. (First To Fourth Standard Schools in Amravati Reopened)

अमरावती जिल्ह्यात जिल्हापरिषद आणि खाजगी शाळांमध्ये (Schools) इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकुण 1 लाख 70 हजार 328 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाने एक फेब्रुवारीपासून प्रत्यक्षपणे ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात् आली होती. परंतू, जिल्ह्यातील कोवीड (Corona) पोझीटीव्हिटी चा दर तीस टक्क्या पर्यन्त गेल्याने सर्व शाळा तसेंच महाविद्यालय बन्द ठेवण्यात् आली होती. मात्र आता कोविड स्थिति पूर्णतः नियंत्रणात असून पोझीटीव्हिटीचा दर फारच कमी झाल्याने जिल्हाधीकारी पवनीत कौर यांनी आजपासून शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

School Reopen: अमरावती जिल्ह्यातील 1ली ते चौथीच्या शाळा सुरु
बीड जिल्ह्यात चाललंय काय? गेवराईत वाळू माफियांचा अतिरेक

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी व्यवस्थापणाच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरु करण्या बाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शाळांना विद्यार्थांसाठी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com