कोविड काळात सेवा देणारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचारी बेरोजगार !

कोरोनाचे सावट कमी होत असताना शासनाने जिल्ह्यातील 750 कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 550 कर्मचाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे.
कोविड काळात सेवा देणारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचारी बेरोजगार !
कोविड काळात सेवा देणारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचारी बेरोजगार !संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : संपूर्ण राज्याबरोबर बुलडाण्यात Buldhana देखील कोरोनाची Corona भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कुटुंबातील आणि रक्ताचे नातेवाईक देखील जवळ हेण्यास धास्तावत नव्हते. अशा वेळी या कोरोना सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा Service दिली. मात्र आता कोरोनाचे सावट कमी होत असताना शासनाने जिल्ह्यातील 750 कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 550 कर्मचाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे.

हे देखील पहा-

शासनाने जिल्ह्यातील 750 कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 550 कर्मचाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. लाखो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. यादरम्यान काही कर्मचाऱ्यांचा सेवा देत असताना मृत्यूदेखील झालेला आहे.त्यामुळे हे सर्व कर्मचारी बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्याला पुन्हा कंत्राटी पद्धतीने का होईना परंतु सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली आहे.

कोविड काळात सेवा देणारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचारी बेरोजगार !
सांगलीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन

यासाठी येणाऱ्या काळामध्ये आंदोलन Agitation करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार कार्यमुक्त केले असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने त्याची सुरुवात झाल्यास या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने पुन्हा रुजू करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com