नांदेड जिल्ह्यात विविध घटनांत पाच जणांचा मृत्यू

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांवर नैसर्गिक वीज कोसळल्याने, एकाने गळफास घेऊन तर पाचव्या घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात विविध घटनांत पाच जणांचा मृत्यू
जिल्ह्यात विज पडून तीन ठार

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांवर नैसर्गिक वीज कोसळल्याने, एकाने गळफास घेऊन तर पाचव्या घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहा जुलै रोजी सायंकाळी चार ते आठच्या दरम्यान बिलोली शिवारातील लोहगाव येथे सुशिलाबाई शिवराम चिंतले (वय ५०) ह्या शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. नागनाथ गंगाराम वानोळे यांच्या माहितीवरुन रामतीर्थ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यातील सिंदगी शिवारात आकाश भीमराव कुरसंगे (वय २७) राहणारा अजनी खेडी तालुका माहूर हा शेतात काम करत असताना त्याच्या अंगावर दहा जुलैच्या सायंकाळच्या सुमारास वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बालाजी नामदेव कुरसंगे याच्या माहितीवरून माहूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज; डायल -११२ कार्यान्वीत

तिसऱ्या घटनेत कंधार तालुक्यातील पोखरणी शिवारात दिनेश केशव पवार (वय २३) याच्यावर वीज कोसळल्याने त्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणी परमेश्वर शिवराम पवार यांच्या माहितीवरुन कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तसेच शिवाजीनगर, मुखेड येथील पद्माकर गोपाळराव मिर्दोडे (वय ३४) याने कुठल्यातरी कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केली. कैलास गोपाळराव मिरदोडे याच्या माहितीवरुन मुखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर शेवटच्या घटनेत कापरवाडी तालुका मुखेड येथील साईराम प्रमोद लांडगे (वय १०) राहणार औराद जिल्हा बिदर हल्ली मुक्काम कापरवाडी तालुका मुखेड हा बालक मामाच्या गावाकडे आला होता. ओढ्याच्या पाण्यात वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला. संभाजी प्रकाश सिमेटवाड यांच्या माहितीवरुन मुखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com