धक्कादायक! कपडे धुवायला गेलेल्या ५ महिलांचा तलावात बुडून मृत्यू

या घटनेत एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश आहे.
धक्कादायक! कपडे धुवायला गेलेल्या ५ महिलांचा तलावात बुडून मृत्यू
Latur Drowning News Saam Tv

लातूर: लातूर (Latur) जिल्ह्यातील किनगाव गावाजवळील तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिला कपडे धुण्यासाठी गेल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश आहे. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Latur Drowning News
केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या; आता पुण्यातही गुन्हा दाखल, अटकेची मागणी

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे ही घटना घडली आहे. यातील काही मजूर अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर साखर कारखाना येथे ऊसतोडीसाठी आले होते. त्यातील पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील सुषमा संजय राठोड, अरुणा गंगाधर राठोड तर याच तालुक्यातील रामपूर तांडा येथील राधाबाई धोंडिबा आडे आणि त्यांच्या मुली काजल धोंडिबा आडे आणि दीक्षा धोंडिबा आडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी किनागाव पोलीस (Police) दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.