BREAKING Nagpur| नागपूरच्या कन्हान नदीमध्ये बुडून पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू!

बुडालेले पाचही तरुण यवतमाळ दिग्रस येथील राहणारे आहेत.
BREAKING Nagpur| नागपूरच्या कन्हान नदीमध्ये बुडून पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू!
BREAKING Nagpur| नागपूरच्या कन्हान नदीमध्ये बुडून पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू!

नागपूर : नागपूरच्या कन्हान नदीमध्ये Kanhan river पाच तरुणांचा बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आज घडली आहे, पारशिवणी Parshivani येथील कन्हान नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीमध्ये बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.Five youths drown in Kanhan river in Nagpur

हे देखील पहा-

हे बुडालेले पाचही तरुण यवतमाळ Yavatmal दिग्रस Digras येथील राहणारे असून ते आज कामठी येथील अम्माचा दर्गा Ammacha Darga येथे सुरू असलेल्या 'उर्स' मध्ये सहभागी होण्यासाठी आले होते त्यावेळी ते दर्ग्याला जायच्या आधी पोहयला गेले असता त्यांच्यावरती हा काळाने घाला घातला आहे.

BREAKING Nagpur| नागपूरच्या कन्हान नदीमध्ये बुडून पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू!
रत्नाआज्जीची दर्दभरी दास्तान; पोटासाठी पंक्चर काढत सावरला संसार

नदीमध्ये बुडालेल्या या युवकांची नावे सय्यद अरबाज वय 21 वर्ष, ख्वाजा बेग वय 19 वर्ष, सप्तहीन शेख 20 वर्ष, अय्याज बेग 22 वर्ष, मो आखुजर 21 वर्ष अशी या तरुणांची नावे असून त्यांच्या मृतदेहांचा शोधकार्य सुरू आहे त्यासाठी एसडीआरफ च्या पथकाचे SDRF पथकाचे पाचारण करण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com