Maharashtra: पुरामुळे कांदळी गावातील १५० कुटूंब बेघर

जिल्ह्यातील कांदळी या गाव लगत नाल्याला रात्रीच्या दरम्यान पूर आल्याने गावातील १५० कुटूंबातील नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे.
Maharashtra: पुरामुळे कांदळी गावातील १५० कुटूंब बेघर
Maharashtra: पुरामुळे कांदळी गावातील १५० कुटूंब बेघरसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ : जिल्ह्यातील कांदळी या गाव लगत नाल्याला रात्रीच्या दरम्यान पूर आल्याने गावातील १५० कुटूंबातील नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे. दिग्रस तालुक्यातील कांदळी गावातील १५० घरांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे परिसरात रात्रभर विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. कांदळी येथील १५० कुटूंबातील नागरिकांना पुराचा फटका बसल्याने अन्न- धान्य सह जीवनावश्यक वस्तू सर्व खराब झाल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.

हे देखील पहा-

रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे यवतमाळ मधील दिग्रस तालुक्यातील कांदळी गावात नाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरात पाणी आल्याने ८० टक्क्यांहून अधिक नागरिक जनावरांसह स्थलांतर झाले आहेत.परिसरात नाल्याचे पाणी आल्याने ८० टक्क्यांहून अधिक नागरिक आणि जनावरांसह स्थलांतर झाले आहेत.

Maharashtra: पुरामुळे कांदळी गावातील १५० कुटूंब बेघर
पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या युवकाचा मृत्यू; एका चिमुकलीसह 5 जण गेले वाहून

दिग्रस तालुक्यातील कांदळी येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे १५० कुटूंबातील नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडले आहे. दरम्यान डिग्रस चे तहसीलदार यांनी रात्रीच्या दरम्यान तांदळी गावाला भेट देऊन, पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर पुराच्या पाण्यात 150 कुटुंबातील नागरिकांना इतर ठिकाणी हालवून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com