रायगड जिल्ह्यात पूरस्थिती, दरड कोसळून वाहतूक बंद

रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात पूरस्थिती, दरड कोसळून वाहतूक बंद
रायगड जिल्ह्यात पूरस्थिती, दरड कोसळून वाहतूक बंदराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड जिल्ह्याला raigad district पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार heavy rain पाऊस पडत असल्याने अनेक भागात पूरस्थिती flood situation निर्माण झाली आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठणे, रोहा, रसायनी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महमार्गावरही mumbai - goa highway रस्त्यावर पाणी साचले असल्याने कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू आहे. माणगाव दिघी रस्त्यावर कुडगाव गावाजवळ डोंगर खचून दरड रस्त्यावर आली आहे. flood situation In Raigad district, traffic was closed due to landslides

हे देखील पहा -

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जाहीर असून 21 जुलै पर्यत काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने नदी किनारी, खाडी किनारी गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सतत पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com