राजापूरात पावसाचा हाहाकार; 150 नागरिक स्थलांतरित

राजापूरात पावसाचा हाहाकार; 150 नागरिक स्थलांतरित
rajapur flood situation

रत्नागिरी : रत्नागिरी ratnagiri जिल्ह्यास रविवारपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आजही (साेमवार) अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूर rajapur परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूरपरिस्थिती rajapur flood situation निर्माण झाली आहे. नदीचे पाणी शहरातील बाजारपेठेत सकाळपासून भरण्यास सुरुवात झाली हाेती. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरू लागल्याने व्यापार्‍याची तारांबळ उडाली. (flood-situation-rajapur-heavy-rain-rescue-operation-ratnagiri-news)

राजापूर अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे हे परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवून आहेत. ते नागरिकांना लागेल ती मदत करीत आहेत.

पावसामुळे राजापूर जवाहर चौकात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. याबराेबरच बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी पाणी झाले आहे. खरंतर ही पूरपरिस्थिती सारखी स्थिती निर्माण झाली आहे. कोदावली आणि अर्जुना नदीने पात्र सोडल्यानं राजापूरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत राजापूरात 153 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 150 पेक्षा अधिक सरासरी पाऊस झाला आहे.

ज्या भागात नागरिकांना अडचण भासत आहे. तेथे तेथील युवक मदतीला जात आहेत. त्यासाठी पालिकेने युवकांना बाेट पूरवली आहे. या युवकांनी जवळपास 150 नागरिकांना स्थलांतरित केले आहे. पावसाचा जाेर कायम राहिल्यास गरजू नागरिकांचे जेवणाचे हाल हाेणार अशी चिन्हं निर्माण झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com