पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या युवकाचा मृत्यू; एका चिमुकलीसह 5 जण गेले वाहून

जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे.
पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या युवकाचा मृत्यू; एका चिमुकलीसह 5 जण गेले वाहून
पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या युवकाचा मृत्यू; एका चिमुकलीसह 5 जण गेले वाहून संदीप नागरे

हिंगोली : जिल्ह्यात पावसाने Heavy Rain हाहाकार उडाला आहे. कयाधू Kayadhu आणि पूर्णा Purna नदीला river आलेल्या पुराच्या flood पाण्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी कळमनुरी Kalamanuri तालुक्यातील येलकी Yelki येथील रहिवासी लखन गजभारे या युवकाचा मृतदेह देखील ग्रामस्थांना उसाच्या शेतात आढळून आला आहे. काल पासून लखन येलकी गावच्या शिवारातील ओढ्यात तो वाहून गेला होता.

हे देखील पहा-

मागील ३ वर्षापासून लखन हा लोकांना संकटकाळी मदत करायचा. आज पर्यंत तब्बल पाचशे जणांना पुराच्या पाण्यातून वाचविले होते. मात्र, आज त्याला लोकांना वाचवताना आपला जीव गमावावा लागला आहे. गेल्या दोन दिवसापासून लखन हा ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करत होता.

पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या युवकाचा मृत्यू; एका चिमुकलीसह 5 जण गेले वाहून
पर्यटन विकासासाठी शाश्वत आराखडा करणार- कृषीमंत्री दादा भुसे

मात्र, काल सायंकाळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या शोध मोहिमेत उसाच्या शेतात, लखन यांचा मृतदेह सापडला आहे. लखनच्या मृत्युने येलकी गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com