रायगडमध्ये कुंडलिका, अंबा, पाताळगंगाला पूर; नदीकाठाला इशारा

रायगडमध्ये कुंडलिका, अंबा, पाताळगंगाला पूर; नदीकाठाला इशारा
कोकणातील बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

राजेश भोस्तेकर

रायगड : संपूर्ण कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. दोन दिसवांपासून रायगड जिल्हयात पावसाचा जोर वाढला आहे. बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांनी अगोदरच नदीकाठीवरील गावांना सतर्क केले होते.

रायगड जिल्ह्यातील रोहा कुंडलिका, नागोठणे येथील अंबा तर रसायनी येथील पाताळगंगा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या भागात काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागोठणे एसटी आगारात पाणी घुसले आहे. परिसरातील रस्तेही जलमय होऊन गेले आहेत. Floods of Amba, Kundalika and Patalganga rivers in Konkan

कोकणातील बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दिघी माणगाव रस्त्यावर दरड कोसळली; रस्ता वाहतुकीस बंद

इतर भागातही पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस सतत पडत राहिल्यास लवकरच बाजारपेठ पाण्याखाली जाऊ शकते. नद्यांनी आपली धोका पातळी ओलांडली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून नदीकिनारी असलेल्या गावांना पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने जिल्हा प्रशासनही सतर्क झालेय. Floods of Amba, Kundalika and Patalganga rivers in Konkan

वाहतुकीवर असा झाला परिणाम

मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. पेणजवळील चुनाभट्टी येथील महामार्गावर पाणी साचले आहे. कोकणात जाणाऱ्या लेनही पाण्याखाली गेली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या घडामोडीकडे लक्ष देऊनच प्रवास करावा.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com