दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरांनी गाठला उच्चांक !

कोरोना नंतरचा आणि बऱ्यापैकी निर्बंध शिथील झाले असतानाचा हा पहिला दसरा आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरांनी गाठला उच्चांक !
दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरांनी गाठला उच्चांक !SaamTV

नाशिक : दसऱ्याच्या Dussehra पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाजारपेठेत Nashik Market फुलांच्या दराने मोठा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे बाजारपेठेत फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर विशेषतः झेंडूच्या फुलांना Flowers मोठी मागणी असल्यानं नाशिकच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांचे दर आजच दीडशे ते दोनशे रुपये शेकडा झाले आहेत तर मोगऱ्याचा दर 1 हजार रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचले आहेत. (Flower rates reached a record high on the eve of Dussehra)

हे देखील पहा -

कोरोना नंतरचा After Corona आणि बऱ्यापैकी सर्व निर्बंध शिथील झाले असतानाचा हा पहिला दसरा असल्याने या दसऱ्याला सर्व नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आणि दसऱ्याच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांना मागणी असते आणि त्याच पार्श्वभूमीवरती बाजारपेठांमध्ये या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असून अन्य फुलांच्या दरातही वाढ झाली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरांनी गाठला उच्चांक !
चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)

यंदा अतिवृष्टीमुळे झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झालंय. उत्पादन घटल्यामुळे बाजारातील फुलांच्या आवक वरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी आजपासूनचं नाशिकच्या बाजार पेठेत झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्या दसऱ्याच्या दिवशी फुलांचे दर आहेत त्यापेक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.