बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलन करत... प्रशासनाचा निषेध...

बीड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यावरून सामाजिक कार्यकर्ते आक्रमक
बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलन करत... प्रशासनाचा निषेध...
बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलन करत... प्रशासनाचा निषेध... विनोद जिरे

बीड : बीड शहरातील खड्ड्याला वैतागलेला सामाजिक कार्यकर्त्यांनी, जिल्हाप्रशासन, नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ, ढोल- ताशाच्या गजरात बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बीड शहरात नगररोड, बार्शीनाका, जालना रोड या भागातील मोठ- मोठे खड्डे नित्याचाच भाग झाला असून, त्यामुळे होणारे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

हे देखील पहा-

बीड शहरातील नगररोड, जालना रोड, बार्शी रोड आदि ठिकाणी वारंवार होणारे खड्डे, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या ठेकेदार कार्यकर्त्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच, डांबराऐवजी काळे तेल, डांबराचा अत्यल्प वापर, भुकटी आदि वापरून खड्डे बुजवण्यात येतात आणि निधी उचलण्यात येतो.

बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलन करत... प्रशासनाचा निषेध...
कल्याणात भाजप महाविकास आघडी सरकार विरोधात निषेध मोर्चा...

तसेच अत्यल्प डांबराच्या वापरामुळे, खडीच्या रस्त्यावर पसरून दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या घटना घडले आहेत. मात्र, आठवडा भरातच पुन्हा खड्डे उघडे पडलेले त्यामुळे, ठेकेदाराच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदारांवर संबधित प्रकरणात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com