Maharashtra : राज्यातील पुरवठा विभागाचे कर्मचारीही निघाले संपावर; जाणून घ्या कारण

यामुळे रेशन पूरवठा हाेऊ शकणार नाही अशी देखील शक्यता आता वर्तवली जात आहे.
 maharashtra, strike
maharashtra, strikesaam tv

- सागर निकवाडे

Nandurbar : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यातील पुरवठा विभागातील कर्मचारी एक मार्च पासून संपावर जाणार आहेत. या आंदाेलनात नंदूरबार जिल्ह्यातील पुरवठा विभागातील कर्मचारी सहभागी हाेणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस तुषार साळुंके यांनी दिली. (Breaking Marathi News)

 maharashtra, strike
Anganwadi Sevika Stirke : अंगणवाडी सेविकांच्या काम बंद आंदाेलनास प्रारंभ; राज्यभरात बेमुदत संप

सरकारने (maharashtra government) पुरवठा विभागातील नव्याने पद भरती प्रक्रिया राबवावी आणि मागील घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी पुरवठा कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. जाेपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत पुरवठा विभागातील कामकाज बंद राहील.

गोडाऊन कार्यालयातील कामकाज मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बंद राहण्याच्या निर्णय पुरवठा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे रेशन (ration) पूरवठा हाेऊ शकणार नाही अशी देखील शक्यता आता वर्तवली जात आहे.

 maharashtra, strike
Nandurbar : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पपईला सर्वाधिक दर; आजपासून लागू

नव्याने होत असणाऱ्या पदभरती संदर्भात जुन्या कर्मचारी वर्गाशी कोणती चर्चा करण्यात आली नाही. पुरवठा विभागाने महसूल विभागाशी समन्वय ठेवून पदभरती करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com