अन्न व औषध प्रशासनाने रामनगरातून जप्त केला साडेचार लाखांचा गुटखा

गोंदियात भाड्याच्या घरात स्टॉक करून ठेवलेल्या साडेचार लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत जप्त केला असून यात 17 प्रकारच्या गुटख्यांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाने रामनगरातून जप्त केला साडेचार लाखांचा गुटखा
अन्न व औषध प्रशासनाने रामनगरातून जप्त केला साडेचार लाखांचा गुटखाअभिजीत घोरमारे

गोंदिया: गोंदियात भाड्याच्या घरात स्टॉक करून ठेवलेल्या साडेचार लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत जप्त केला असून यात 17 प्रकारच्या गुटख्यांचा समावेश आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुभम धनकुमार जैन वय 28 वर्ष असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Food and Drug Administration seized gutka worth Rs 4.5 lakh from Ramnagar)

हे देखील पहा -

गोंदिया शहरातील रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बाजार चौक रामनगर परिसरातील वैष्णवी नर्सिंगच्या समोर असलेल्या भुजाडे यांच्या घरी भाड्याची खोली घेऊन शुभम धनकुमार जैन वय 28 वर्ष याने गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गुप्त माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून 4 लाख 35 हजाराचा गुटखा जप्त केला आहे. या धाडीत 17 प्रकारचे पानमसाला विमल गुटखा, पानबहार पानमसाला, विमल पानमसाला, राजश्री पानमसाला, रजनीगंधा, विमल, रत्ना स्कॅनटेड तंबाखू, पानपसंद पानमसाला, झेन टोबॅको, बाबा 120, बाबा 160, सितर गुटखा, ईगल, तुलसी टोबॅको अशा प्रकारचा एकुण 4 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने रामनगरातून जप्त केला साडेचार लाखांचा गुटखा
विना तिकिट प्रवास करणाऱ्या 17 हजार लोकांवर गोंदिया रेल्वे विभागाची कारवाई

या गुटख्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तसेच आरोपीवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.