शालेय पोषण आहारातुन विद्यार्थ्यांना विषबाधा; पेठसांगवी येथील घटना

एका मुलाच्या डब्यात पालीचे मुंडके तर दुसऱ्याच्या डब्यात पालीचा दुसरा भाग आढळुन आला.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv

उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहाराच्या खिचडीमध्ये पाल पडून 55 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पेठसांगवी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये (School) 253 पटसंख्या आहे. काल या विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी खिचडी वाटप करण्यातआली होती. यापैकी काही विद्यार्थ्यांनी शाळेतच खाल्ली तसेच काही विद्यार्थी घरी घेऊन जात असतानाच एका मुलाच्या डब्यात पालीचे मुंडके तर दुसऱ्याच्या डब्यात पालीचा दुसरा भाग आढळुन आला.

हे देखील पहा -

याबाबत पालकांनी तात्काळ शाळेत येऊन ही माहीती देत विद्यार्थ्यांना नांगरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर 16 विद्यार्थ्यांना रुग्णवाहीकेतुन उमरगा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. उलटी,मळमळ, डोके दूखणे,चक्कर येणे असा त्रास होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच नाईचाकुर येथील डॉक्टरांची टिम बोलावून शाळेतील एका रुममध्ये देखली विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com