Pandharpur : दोन वर्षानंतर प्रथमच विठुरायाच्या चरणी भरभरुन दान!

कार्तिकी यात्रेत मंदिर समितीला 1 कोटी 97 लाखांच्या देणग्या...
Pandharpur : दोन वर्षानंतर प्रथमच विठुरायाच्या चरणी  भरभरुन दान!
दोन वर्षानंतर प्रथमच विठुरायाच्या चरणी भरभरुन दान! भारत नागणे

पंढरपूर : कोरोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्षानंतर यंदा पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा सोहळा उत्साहात पार पडला. कार्तिकी यात्रे दरम्यान भाविकांनी विठुरायाच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. कार्तिकी यात्रेत तब्बल 1 कोटी 97 लाख रुपयांची देगणी मंदिर समितीला मिळाली आहे. दोन वर्षानंतर प्रथमच विठुरायाची दानपेटी भरली आहे. कोरोनामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सलग दीड वर्षे बंद होते. मंदिर बंद असल्याने मंदिर समितीच्या देणगीवर मोठा परिणाम झाला होता. तरीही कोरोना काळात मंदिर समितीने सामाजिक भान राखत अनेक गोरगरीब व अनाथ लोकांना मदत केली. शिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मदतही केली होती.

हे देखील पहा :

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने घटस्थापने पासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी मुख दर्शनासाठी खुले केले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत मंदिर समितीने भाविकांना मुख दर्शनाची सोय केली आहे. वारकरी संप्रदायाच्या मागणीनुसार यंदा प्रशासनाने दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यास परवानगी दिली. त्यानुसार नुकतीच कार्तिकी यात्रा पार पडली. एसटीचा संप सुरु असला तरी यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी पंढरीत हजेरी लावली होती.

दोन वर्षानंतर प्रथमच विठुरायाच्या चरणी  भरभरुन दान!
Akola : पातुर च्या धामणदरी तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू!
दोन वर्षानंतर प्रथमच विठुरायाच्या चरणी  भरभरुन दान!
बनावट कागदपत्रे दाखवून ठाणे महापालिकेच्या सदनिकांमध्ये घुसखोरी! कारवाईची मागणी

यंदाच्या वारीला भाविकांची संख्या कमी असली तरी देवाच्या पेटीत मात्र भाविकांनी भरभरुन दान अर्पण केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 1 कोटी 85 लाख रुपयांचे अधिकचे दान विठुरायाच्या चरणी भाविकांनी अर्पण केले आहे. करोनामुळे मागील दोन वर्षात आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघीसह प्रमुख सात यात्रा रद्द झाल्या होत्या. परिणामी मंदिर समितीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. यावर्षी कार्तिकी यात्रा पार पडल्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नातही घसघसीत वाढ झाली आहे. दरम्यान आज महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com