नंदुरबारमध्ये लाकडांची तस्करी करणाऱ्या ट्रकवरती वन विभागाची कारवाई!

एकूण पाच लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त.
नंदुरबारमध्ये लाकडांची तस्करी करणाऱ्या ट्रकवरती वन विभागाची कारवाई!
नंदुरबारमध्ये लाकडांची तस्करी करणाऱ्या ट्रकवरती वन विभागाची कारवाई!दिनू गावित

नंदुरबार : वनविभागाला Forest Department मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवापूर शहराच्या हद्दीतून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रक Truck क्रमांक MH 26 AD 0103 संशयित वाहनाला करंजी खुर्द गावाजवळ वनविभागाने अडवून तपासणी केली असता सदर वाहनात अवैधरित्या मशीनने कटिंग केलेली पंचरास जळावू लाकूड साठा आढळून आला आहे. Forest department action on timber smuggling truck

हे देखील पहा-

सदर मुद्देमाल विनापरवाना वाहतूक होत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर वनविभागाने सदर ट्रक शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केला असून वन रक्षक करंजी खुर्द यांनी गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू केली. सदरील लाकूडमाल ट्रक असा एकूण पाच लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

नंदुरबारमध्ये लाकडांची तस्करी करणाऱ्या ट्रकवरती वन विभागाची कारवाई!
Money Heist Song | Money Heistच्या गेटअपमधून कोण देतय लसीकरणाचा संदेश (पहा व्हिडीओ)

एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा सांगत असतानाच अशाप्रकारे अवैद्य वृक्षतोड होत असेल तर हे प्रशासनाचे अपयशच आहे आत्ताच गडचिरोली मध्ये जवळपास पाचशे झाडांची कत्तल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आता आरोपीला पकडलं तरी झाडे मेलीच ना त्यामुळे उशीरा सुचलेलं शहाणपण काय कामाच अशा प्रकारच्या वृक्षतोड होऊच नये यासाठी प्रशासनाने तत्पर राहण्याची गरज आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com