"बच्चू कडू नौटंकीबाज आंदोलक; कधी अंगावर साप, तर कधी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतात!

माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा बच्चू कडूंवर शाब्दिक प्रहार!
"बच्चू कडू नौटंकीबाज आंदोलक; कधी अंगावर साप, तर कधी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतात!
डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपा चांदुर बाजार चे आंदोलन!अरुण जोशी

अमरावती : चांदुर बाजार तालुका २ वर्षापासुन अधांतरी आहे. विकासाची कामे थांबलेली आहेत. रेती, गुटखा, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, वृक्षारोपण व मनरेगामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याविरुद्ध माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपा चांदुर बाजार व सर्व अन्यायग्रस्त जनतेतर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जयस्तंभ चौक येथे चक्का जाम आंदोलन करून त्याच ठिकाणी तहसीलदारांना बोलवून निवेदन देण्यात आले.

हे देखील पहा :

चांदुर बाजार तालुक्यामध्ये या वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. पाण्यामुळे तुरी जळल्या.कापसाचे बोंड सडली. संत्राची फळगळ सातत्याने सुरु आहे. ७०% पेक्षा जास्त संत्रा बाग खाली झाले आहे. परंतु शासनाने याची दखल घेतली नाही. या शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टर १ लाख रुपये प्रमाणे मदत द्यावी. तसेच संत्राचा पिक विम्याचे हप्ते वाढविले परंतु विमा मिळाला नाही.

डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपा चांदुर बाजार चे आंदोलन!
धक्कादायक! सोयाबीनच्या पैशांच्या वादातून मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!

संत्राकरिता पिक विम्याचे हप्ते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातीलच ठेवावे व सोयाबीन, कापूस, तुरीचा विमा लागू करण्यात यावा अशी मागणी या जन आक्रोश आंदोलनात भाजप तर्फे करण्यात आली. या जनआक्रोश आंदोलनात माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोन्डे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा चांगलाच समाचार घेत जोरदार शाब्दिक प्रहार केला. यावेळी बच्चू कडू हे नौटंकीबाज आंदोलक असून ते कधी अंगावर साप, फटाके बांधून तर कधी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतात अशी टीका यावेळी डॉ.बोंडे यांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.