विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी? उपसभापती नीलम गोऱ्हेंना दिलं पत्र

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 shivsena leaders gives letter to neelam gorhe
shivsena leaders gives letter to neelam gorhe saam tv

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाची सुनावणी प्रलंबित असतानाही आता शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Ambadas Danve) अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस एका पत्राद्वारे केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अंबादास दानवे यांच्या नियुक्तीच्या शिफारसीचे पत्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना दिले आहे. शिवसेना आमदार सचिन अहिर यांच्याही नावाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 shivsena leaders gives letter to neelam gorhe
चकरा मारतायत पण पाळणा हलेना; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका

शिवसेना प्रमुख यांनी पत्रात असं म्हटलंय की, शिवसेना विधिमंडळ पक्षाची ९ जुलै २०२२ रोजी बैठक झाली. या विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला. त्यानुसार मी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर विधान परिषद सदस्य आंबादास दानवे यांची नियुक्ती करण्याबाबत आपणास शिफारस करत आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com