वाढदिनीच काॅंग्रेसच्या नेत्याचे निधन; दुपारी गावी अंत्यविधी

वाढदिनीच काॅंग्रेसच्या नेत्याचे निधन; दुपारी गावी अंत्यविधी
madhukar thakur

रायगड : काॅंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर madhukar thakur (वय 74) यांचे प्रदीर्घ आजाराने आज (गुरुवार, ता. 15) पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. अलिबाग उरण मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले हाेते. श्री. ठाकूर यांचा आजच वाढदिवस आहे. वाढदिनीच त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. (former-congress-leader-madhukar-thakur-is-no-more-alibagh-uran)

त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग -  उरण मतदारसंघाचे ते आमदार होते.

रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त हाेऊ लागली आहे. आज दुपारी दाेन वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांची निकटवर्तीयांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com