Satara News: पाण्यासाठी महिलांचा सीओंना घेराव, भले अटक झाली तरी चालेल आता मागे हटणार नाही; माजी उपाध्यक्षांचा इशारा

मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर महिलांनी आंदाेलन घेतले मागे.
Satara, Water Supply, Satara Muncipal Council
Satara, Water Supply, Satara Muncipal Councilsaam tv

Satara News : येत्या दहा दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर राजवाडा, मोती चौक परिसरात रास्ता रोको (rasta roko aandolan) करणार असल्याचा इशारा सातारा पालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश कदम (avinash kadam) यांनी सातारा पालिका प्रशासनाला (satara muncipal council) इशारा दिला आहे. त्यापुर्वी अनियमित पाण्याबाबत महिलांनी पालिकेच्या मुख्याधिका-यांना घेराव घातला.

Satara, Water Supply, Satara Muncipal Council
Satara News : पुण्याची सात फेटेवाला, साता-याची चॅटींग; नट-खट राज्य बाल एकांकिका स्पर्धेत यश

सातारा शहराच्या पश्चिम भागात असणाऱ्या मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ व आजू बाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

केवळ तांत्रिक गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने नागरिकांना केवळ पंधरा मिनिट पाणी येऊ लागल्याने या भागातील नागरिकांनी आज माजी उपाध्यक्ष अविनाश कदम यांची भेट घेतली व त्यांची समस्या मांडली. (Maharashtra News)

त्यानंतर कदम यांच्यासह महिलांनी पालिकेत मुख्याधिकारी अभिजित बापट (abhijeet bapat) यांना घेराव घातला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते.

मुख्याधिका-यांपुढे महिलांनी पाणी पूरवठा हाेत नसल्याची तक्रार केली. तसेच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आंदाेलकांसमाेर पाणी पुरवठा विभागाला तक्रार निवारण करण्याचे तातडीने आदेश दिले.

Satara, Water Supply, Satara Muncipal Council
Supriya Sule : हे अतिशय संतापजनक आहे ! एसटी कर्मचारी आत्महत्येस सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं जबाबदार

या आंदाेलनानंतर अविनाश कदम यांनी नागरिकांच्या अडचणी येत्या दहा दिवसांत न सुटल्यास आम्ही मोती चौकात रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा पालिका प्रशासनास दिला.

ते म्हणाले आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांच्या पाठपूराव्यातून नव्या पाण्याच्या टाकीसाठी निधी आणला जाईल. पालिकेला पैसे पण आणून द्याचे, सगळं करायचे आणि नागरिकांना पाणी दिलं जात नाही.

हे ढिल्या कारभारामुळे की काेणाच्या दबावाखाली सुरु आहे अशी आम्हांला शंका आहे. भले अटक झाली तरी चालेल पण मागे हटणार नाही.

आत्ताच अशी अवस्था तर मे महिन्यात फुलपात्र घेऊन पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागेल अशी भिती कदम यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com