Political News : भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मंत्रिपद भूषवलेला नेता शिंदे गटात जाणार

शिवसेना नेते, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysaam tv

निवृत्ती बाबर

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या मंचावर भाषण सुरू असताना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आजच दीपक सावंत यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सावंत यांच्या शिंदे गटात जाणार असल्याने मोठा धक्का बसणार आहे. (Latest Marathi News)

ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब भवनमध्ये हा पक्षप्रवेश झाला. भूषण देसाई यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आणखी एक बडा नेता, माजी मंत्री शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : सूरत-गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांना का थांबवलं नाही?; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितलं नेमकं कारण

ठाकरे गटातील अनेक नेत्यांकडून शिंदे गटात सुरूच आहे. ठाकरे गटाला उतरली कळा लागली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषदेचे माजी सदस्य दीपक सावंत शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आसल्याची माहिती समोर आली आहे.

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आजच शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश बाळासाहेब भवन येथे पार पडणार आहे.

कोण आहेत दीपक सावंत?

दीपक सावंत (Deepak Sawant) हे विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : मी घरी बसून जे केलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन तुम्हाला जमलं नाही, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com