माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

मंत्रिमंडळात माझा नंबरही लागेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam Tv

मुंबई : मंत्रालयातील आयटी विभागाच्या सचिवांना मारहाण केल्याप्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) अडचणीत सापडले होते. मात्र, कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने दिलासा मिळाला आहे. सचिवांना मारहाण प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये क़डू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील आठवड्यात गिरगाव न्यायालयाने बच्चू कडू यांना अटक करून 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. परंतु, कडू यांना सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा देत आज जामीन मंजूर केला आहे. (Former minister bacchu kadu got bail from mumbai session court)

Bachchu Kadu
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाचे 'हे' महत्वाचे निर्णय; तरूणांसह पोलिसांनाही 'दिवाळी गिफ्ट'

मंत्रिमंडळात माझा नंबरही लागेल

बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज कोर्टात सुनावनणी होती त्यासाठी आलो होतो.आज मला नियमीत जामीन मंजूर झाला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल. काही इनकमिंग बाकी असल्यामुळे कदाचित राहिला आहे.

Bachchu Kadu
Shambhuraj Desai: आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शंभूराज देसाई स्पष्टच बाेलले

चांगली लोकं अजूनही पाठींबा देण्यासाठी इच्छुक आहेत.मुहुर्त अजून ठरलेला नाही. माझा नंबरही लागेल. मला शिंदेसाहेबांवर विश्वास आहे. आपल्या सूत्रांनीच ही माहिती दिलीय. मुख्यमंत्री एकटे नाहीत.आम्ही सर्व सोबत आहोत.आम्हाला नुसतं राजकारण करायचं नाही.केंद्रातून नवे उद्योगही आणण्याचा प्रयत्न आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com