माजी आमदार मुरकुटेंचा मंत्री गडाखांच्या "मुळा"वर घाव

माजी आमदार मुरकुटेंचा मंत्री गडाखांच्या "मुळा"वर घाव
बाळासाहेब मुरकुटे यांचे कार्यकर्त्यांसह मुळा साखर कारखान्यासमोर उपोषण.

विनायक दरंदले, सोनई (अहमदनगर): माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मुळावरच घाव घालण्यास सुरूवात केली आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले. आता मुळा साखर कारखान्यासमोर उपोषण सुरू केलंय.

कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उसाला प्रतिटन दोन हजार आठशे रुपये भाव मिळालाच पाहिजे. या मागणीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपा कार्यकर्त्यांनी आज सकाळी मुळा साखर कारखान्याच्या प्रवेशद्वार परिसरात लाक्षणिक उपोषण केलं.Former MLA Balasaheb Murkutes fast in front of Mula factory

बाळासाहेब मुरकुटे यांचे कार्यकर्त्यांसह मुळा साखर कारखान्यासमोर उपोषण.
पंकजा मुंडे , विनोद तावडे मोदींच्या भेटीला

माजी आमदार मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता उपोषणास सुरुवात झाली. यावेळी 'जय जवान जय किसान','भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ऋषीकेश शेटे, स्वप्नील सोनवणे, अंकुश काळे, लक्ष्मण माकोणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 'मुळा'च्या कारभारावर उपस्थितांनी टीका करून मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात दाद मागू असे भाषणात सांगितले.

मागील आठवड्यात उसाच्या भाववाढीसंदर्भात कार्यकारी संचालकास निवेदन देण्यात आले होते. यानंतर संचालक मंडळाने कुठलाही निर्णय जाहीर केला नसल्याने आज उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले व संचालक बापुसाहेब शेटे यांनी उपोषणस्थळी जाउन कारखाना व्यवस्थापनाची बाजू मांडली. दुपारी दोन वाजता उपोषण मागे घेण्यात आले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा साखर कारखान्याचेकामकाज नेहमीच सभासदहिताचे राहिले आहे. कारखान्यास मिळालेला उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार त्याची पावती आहे.Former MLA Balasaheb Murkutes fast in front of Mula factory

- नानासाहेब तुवर, अध्यक्ष, मुळा कारखाना.

मुळा आणि ज्ञानेश्वर साखर कारखाने तालुक्याची कामधेनू आहे. योग्य नियोजन करत नेहमीच उस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित पाहिले जाते. येथील कारभार पारदर्शक असल्यानेच मागील निवडणूक बिनविरोध झाली आहे.

- सुनील वीरकर,सभासद, धनगरवाडी.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com