माजी आमदार आर.एम. वाणी यांचे अल्पशा आजाराने निधन

तीन वेळा आमदार म्हणून त्यांची कारकीर्द राहिली
माजी आमदार आर.एम. वाणी यांचे अल्पशा आजाराने निधन
माजी आमदार आर.एम. वाणी यांचे अल्पशा आजाराने निधनडॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापुरचे Vaijapur शिवसेनेचे Shivsena माजी आमदार आर.एम. वाणी Rangnath Wani यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वाणी यांनी सुरुवातीला पत्रकार, त्यानंतर नगराध्यक्ष आणि तीन वेळा आमदार म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. विधानसभा गाजविणारे, नाशिक-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील भागासाठी उभारलेल्या नांदूर मधमेश्वर कालव्याचे जनक, एक अभ्यासू, हजरजबाबी, निर्भीड, प्रशासकीय वचक असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती.

हे देखील पहा-

आर. एम. वाणी यांचे मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले. आर.एम. वाणी यांची अंतिमयात्रा निवासस्थानाहून येवला रोड - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा - संकट मोचन हनुमान मंदिर - टिळक रोड - जामा मस्जीद - पाटील गल्ली मार्गे व अंत्यविधी वैजापुर अमरधाम येथे सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. आर. एम. वाणी यांच्या निधनामुळे जनकल्याण प्रश्नांची जाण असणारा नेता गमावला असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक देखील व्यक्त केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com