माजी आमदाराचा महावितरणच्या कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न! पहा Video

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा वीज तोड प्रकरणी महावितरण कार्यालय मध्येच गळफास घेण्याचा प्रयत्न..!
माजी आमदाराचा महावितरणच्या कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न! पहा Video
माजी आमदाराचा महावितरणच्या कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न! SaamTvNews

अहमदनगर : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शेतकऱ्यांच्या वीजतोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. सध्या नेवासा तालुक्यात महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कट केली जात असून याबाबत नेवासा तालुका भाजप आक्रमक झाले आहे.

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वीज प्रश्नाबाबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा भाजपचे पदाधिकारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते.  नेवासा भाजपच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती.

माजी आमदाराचा महावितरणच्या कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न!
वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video

मात्र, यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने संतप्त झालेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच शेतकऱ्यांच्या वीज तोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तीन तासापासून हे ठिय्या आंदोलन सुरू होते. अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य न केल्याने संतप्त होऊन मुरकुटे यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांचा श्वास रोखल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com