Nilesh rane : 'दूध का दूध पानी का पानी' होईल; शशिकांत वारीसे प्रकरणावरून विनायक राऊतांच्या आरोपांना राणेंकडून उत्तर

विनायक राऊत यांच्यावर आरोपांवर नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Nilesh Rane
Nilesh RaneSaam Tv

विनायक वंजारे

Nilesh Rane News : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेला पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात हा घातपात असा संशय लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूवरून राजकीय नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी थेट शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत यांच्या आरोपांना नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शशिकांत वारीसे प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निलेश राणे म्हणाले,' खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा फरक पडत नाही. मात्र, सातत्याने खोटं बोलत आहे, ते लोकांना कळलं पाहिजे. या प्रकरणातील आरोपी गेल्या सहा महिन्यात काय करत होता, हे पोलीस चौकशीत बाहेर येईल. पण या प्रकरणाची चौकशी सुरू असताना खासदार विनायक राऊत यांची ढवळाढवळ सुरू आहे,ही ३५३ केस होऊ शकते. त्यांच्या वक्तव्याने फरक पडत नाही'.

Nilesh Rane
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी BJPचा मेगाप्लान; काय आहे मिशन १५०?

' विनायक राऊत (Vinayak Raut) यांना हवेत गोळीबार करण्याची जुनी सवय आहे. पोलीस चौकशीत खरं-खोटं बाहेर येईल. कोकणाला जे हवं होतं, त्यापेक्षा विनायक राऊत राणेंकडे बोट दाखवून या प्रकरणात मुख्य विषयापासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न विनायक राऊत करत आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर चौकशी करायची आहे ती करा म्हणजे दुध का दुध पाणी का पाणी होईल, असे निलेश राणे म्हणाले.

Nilesh Rane
Ajit Pawar : 'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात आलं, त्यामुळे...'; अजित पवारांचं शिवसैनिकांना आवाहन

काय म्हणाले होते विनायक राऊत ?

शशिकांत वारीसे प्रकरणावरून विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावर आरोप केला होता. विनायक राऊत म्हणाले होते, 'पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरीच्या पैशांवर पोसणारा गुंड आहे. त्यामुळे त्यांच्या सारख्या गुंडाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.वारीसे यांची हत्या घडवून आणली असून याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे'.

'पंढरीनाथ आंबेरकर हा गुंडगिरी करणारा असून नारायण राणे किंवा निलेश राणे यांच्याबरोबर असतो.त्यांच्या चिथावणीमुळे वारीसेसारखा पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेरकरने आखलं, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com