Raigad Crime: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिवसेनेचे माजी रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला
Raigad Crime: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Raigad Crime: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलSaam Tv

रायगड: शिवसेनेचे माजी रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचे मित्रासोबत (friend) असलेले फोटो (Photo) सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल (Viral) केल्याप्रकरणी बबन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचे मित्राबरोबरचे असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल (Viral) केल्या प्रकरणी शिवसेनेचे (Shiv Sena) माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील आणि खारघरचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Former Shiv Sena district chief Baban Patil been charged indecency)

हे देखील पहा-

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने बबन पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पीडित महिला ही करंजाडे वडघर या गावातील (village) रहिवाशी आहे. ही महिला पतीपासून विभक्त कुटूंबात राहते. खूप दिवसाअगोदर या पीडित महिलेने मित्राबरोबर काढलेले सेल्फी (Selfie) फोटो, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी व्हॉटसअप (WhatsApp) ग्रुपवर व्हायरल केले होते. तसेच खारघर शहराचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी देखील हे फोटो सोशल मिडायावर व्हायरल केले होते.

व्हायरल मेसेजमध्ये शिवेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांचे शहर प्रमुखांचा प्रताप असे लिहीत फोटो व्हायरल केले होते. मित्राबरोबरचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे पीडित महिलेला समजल्यावर, या घटनेचा जाब विचारण्याकरिता पीडित महिला शंकर ठाकूर यांच्या घरी गेले होते. यावेळी शंकर ठाकूर यांनी अर्वाच्य आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करून घरात धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. मित्राबरोबर जशे फोटो काढले आहेत.

Raigad Crime: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Pune Crime: अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी 2 तासांत केलं गजाआड

तसेच फोटो माझ्याबरोबर काढ, असे म्हणत माझ्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न देखील केल्याचा आरोप या महिलेने तक्रारीमध्ये केला आहे. तुझे फोटोचे बॅनर बनवून खारघर शहरात लावण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील पीडित महिलेने केला आहे. बबन पाटील यांनी देखील तुझे फोटो २ दिवसात बॅनर करून शहरात लावतो, अशी धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेने माझी बदनामी झाल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी बबन पाटील आणि शंकर ठाकूर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून ही राजकीय खेळी असल्याचे बबन पाटील यांनी सांगितले आहे. तर शिवसेना हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. सदरची घटना आपल्याला समजली असून झालेल्या गंभीर आरोपाप्रकरणी पक्षातील वरिष्ठ नेते चौकशी करून योग्य ती दखल घेणार आहेत, असे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com