रायगड जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी हाती पुन्हा बांधले शिवबंधन

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
रायगड जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी हाती पुन्हा बांधले शिवबंधन
रायगड जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी हाती पुन्हा बांधले शिवबंधनराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे हे पुन्हा स्वगृही परतले आहेत. अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत संजय जांभळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अलिबाग चाळमळा येथील आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. संजय जांभळे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने वडखळ पेण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका नजरेसमोर ठेवून शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत जिल्ह्यातील पहिला मासा संजय जांभळेच्या रूपाने गळाला लागला आहे. Former vice president of Raigad Zilla Parishad sanjay jambale has joined again shivsena

हे देखील पहा -

शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आ. महेंद्र शेठ दळवी, शिवसेना उप जिल्हा प्रमुख नरेश गावड, शिवसेना पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी 20 जुलै रोजी पक्षप्रवेश केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संजय जांभळे यांनी सांगितले की, शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिक म्हणून काम करताना पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती संभाळणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी हाती पुन्हा  बांधले शिवबंधन
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

संजय जांभळे व त्यांची पत्नी हे 2007 साली शिवसेनेच्या तिकीटावर रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. संजय जांभळे हे त्यावेळी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदासोबत अर्थ आणि बांधकाम सभापती पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांनी पक्षीय मतभेदांमुळे शिवसेनेला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही सोडचिठ्ठी देऊन 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील यांना विधानसभेत जिकून देण्यात जांभळे यांचा हातभार होता. मात्र आता रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संजय जांभळे यांनी भाजपला रामराम केला असून पुन्हा स्वगृही शिवसेनेत येऊन शिवबंधन हाताला बांधले आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने पेण तालुक्यात शिवसेना पक्ष बळकट होण्यास मदत मिळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com