Aurangabad News: औरंगाबादेत ट्रक आणि कारचा भीषण अपघात; माजी जिल्हा परिषद सदस्याचा जागीच मृत्यू

औरंगाबादमधून रस्ते अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे.
Aurangabad Accident News
Aurangabad Accident News Saam Tv

Aurangabad News : औरंगाबादमधून रस्ते अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटात एका ट्रकने कारला मागून जोराची धडक दिली. सोमव या घटनेत माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Aurangabad Accident News
Jaykumar Gore Accident: भीषण अपघात, आयसीयूमध्ये उपचार अन् तरीही... आमदार गोरेंच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटात एका ट्रकने कारला पाठमागून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला कार धडकली. सोमवारी ही अपघाताची घटना घडली आहे.

नेमका अपघात कसा घडला ?

औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही ट्रकच्यामध्ये कार दबली गेल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चिंचोली लिंबाजी येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. तर जखमींमध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.

Aurangabad Accident News
Paragliding Accident : ४०० फुटांवर गेल्यावर पॅराशूटचा बेल्ट तुटला अन्.., साताऱ्यातील तरुणासोबत घडली भयंकर घटना

मुंबई फिरून परतताना गाठले मृत्‍यूने; कार टँकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

मुंबईहून पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सकाळी सात वाजेच्या सुमारास कार व ट्रॅंकरचा अपघात झाला. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्‍या टॅंकरने कारला जोरदार धडक दिल्याने यात पारोळा नगरपालिकेचा अभियंता कुणाल सौपुरे (वय ३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा) व एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉ. निलेश मंगळे (वय ३५, रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप पवार (वय ३७) हा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com