चार अल्पवयीन आरोपींनी मिळून केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

नागपुरात हत्येचे सत्र सुरूच
चार अल्पवयीन आरोपींनी मिळून केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या
चार अल्पवयीन आरोपींनी मिळून केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्याSaam Tv

मंगेश मोहिते

नागपूर - चार अल्पवयीन आरोपींनी मिळून सामाजिक कार्यकर्त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींनी ताब्यात घेतले आहे. शुल्लक कारणावरून हत्या झाल्याने परिसरात खडबड माजली आहे. नागपुरात हत्येचे सत्र सुरूच आहे. नागपुरात हत्याच्या घटना थांबत नसल्याने नागरिक हैराण आहेत. नागपुरात हत्या सत्र सुर असतानाच आज पहाटे आणखी एक हत्या झाली आहे.

हे देखील पहा -

सुनील जवादे असे हत्या करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. पहाटेच्या वेळी त्यांच्यावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहिती नुसार आरोपी हे अल्पवयीन असून काहीतरी शुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती देण्यात येत आहे. दोन आरोपी शिक्षण घेत असून दोघांनी शिक्षण सोडलं आहे.

चार अल्पवयीन आरोपींनी मिळून केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या
Nagpur: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक होणार 'नॉट रीचेबल'

हे युवक परिसरात दारू सिगारेट प्यायचे यावेळी सुनील जवादे यांनी त्यांना याप्रकणी रागावले असत त्याचा राग मनात धरून यांनी ही हत्या केली  असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. शुल्लक कारणावरून आरोपीने एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या हत्तेच्या घटने मुळे परिसरात चांगलीच खडबड माजली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com