माढ्याच्या सब जेल मधुन चार सराईत आरोपींनी ठोकली धूम !

माढ्याच्या सबजेल मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले गंभीर गुन्ह्यातील चार सराईत आरोपी ड्युटीवर वर असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करुन पळुन गेले आहेत.
माढ्याच्या सब जेल मधुन चार सराईत आरोपींनी ठोकली धूम !
माढ्याच्या सब जेल मधुन चार सराईत आरोपींनी ठोकली धूमभारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर - माढ्याच्या Madha सबजेल Sub-Jail मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले गंभीर गुन्ह्यातील चार सराईत आरोपी ड्युटीवर वर असलेल्या पोलिसाला Police धक्काबुक्की करुन पळुन गेले आहेत. सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही खळबळजनक घटना Incident घडली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान‌ सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास निमगाव (मा); महातपुर गावच्या शिवारात माढा पोलिसांनी शिताफीने अक्षय राॅकी भालेकर या आरोपीस पकडण्यात यश आले आहे. सिद्धेश्वर कैचे, अकबर सिद्दाप्ना पवारआकाश उर्फ अक्षय राॅकी भालेकर ,तानाजी लोकरे अशी पळुन गेलेल्या चौघा गुन्हेगाराची नावे आहेत. पोलिस नाईक शहाजी डुकरे यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार चार ही आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा व सबजेल मधुन पळुन गेल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

माढ्याच्या सब जेल मधुन चार सराईत आरोपींनी ठोकली धूम
धारदार शस्त्रांनी प्रेयसीचा खून; 3 आरोपींना नागपूरातुन अटक

झालेल्या झटापटीत पोलिस डुकरे यांना जखम देखील झाली आहे. यापुर्वी आरोपी अकबर पवार यास फिट येत असल्याने उपचारासाठी नेल्याच्या नोंदी सबजेलच्या रजिस्टर मध्ये आहेत.

याच प्रकारे आरोपी अकबर पवार यास झटका आल्याचे रुम नं.१ मधील आरोपीने ड्युटीवर असलेल्या शहाजी डुकरे या पोलिसांना आरडा ओरड करीत सांगितले. कर्मचारी डुकरे यांनी अकबर पवार ला बाहेर काढण्यासाठी जेलचे दार उघडताच चौघांनी डुकरे यांना धक्काबुक्की करुन सबजेल मधुन धुम ठोकली. अन्य तीन आरोपीच्या शोधासाठी पोलिस Police पथक तैनात केले आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com