सोनईत चार तास मुसळधार, कौतुकीच्या पुराने बाजारपेठेला वेढले

सोनईत चार तास मुसळधार, कौतुकीच्या पुराने बाजारपेठेला वेढले
कौतुकी नदीच्या पाण्याने सोनईची बाजारपेठ वेढली आहे.

विनायक दरंदले, सोनई (अहमदनगर): एक महिन्याच्या विश्रांतीनंतर काल (रविवारी) सोनई व परिसरात सलग चार तास पावसाने जोरदार हजेरी लावली. कौतुकी नदीला पूर येवून अनेक ओढे, नाले वाहते झाले आहे. काही दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दोन दिवस वातावरणात प्रचंड उकाडा होता. रविवारी सायंकाळी सात वाजता हलक्या पावसास सुरुवात झाली. पंधरा मिनिटाने सुरु झालेला मुसळधार पाऊस सलग साडेतीन तास सुरु होता. सर्व रस्ते आणि गल्लीबोळात पाण्याचे तळे साचले होते. पहाटे तीननंतर सोनईतील कौतुकी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. नवी पेठ, शिवाजी रस्ता विवेकानंद चौकातील पुलावरुन पाणी वाहत होते. जुना वांबोरी रस्ता वाहतुकीसाठी काही तास बंद होता. अनेक दुकानात पाणी शिरुन नुकसान झाले आहे. Four hours of heavy rain in Sonai

कौतुकी नदीच्या पाण्याने सोनईची बाजारपेठ वेढली आहे.
पंकजा मुंडे , विनोद तावडे मोदींच्या भेटीला

आज सकाळी गणेशवाडी, मोरयाचिचोंरे, घोडेगाव, खरवंडी, शनिशिंगणापूर येथे भेट देवून पाहणी केली असता अनेक शेतात पावसाचे पाणी साचल्याचे दिसले. कडवळ आणि चारापीके भुईसपाट झाली. कांदा, नवीन पेरणी व काढणीला आलेल्या भुईमूग पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असले तरी या पावसाबद्दल शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात याप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. सोनई-१०३ मिलीमीटर, चांदे-९०, वडाळा बहिरोबा-७७, नेवासे-७०,घोडेगाव-६३, कुकाणे-४३, सलबतपूर- १५.

देडगाव, कौठा, शहापूर भागात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा टिकत नव्हता. भरणे होत नसल्याने शेताचे नुकसान पाहवत नव्हते. कालच्या पावसाने उसपीकासह सर्व पिकास फायदा झाला. ओढे, नाले वाहते झाल्याने आनंद झाला. Four hours of heavy rain in Sonai

- रावसाहेब काळे, शेतकरी, कौठा.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com