३ लाखांचा RTO टॅक्स वाचवायला गेलेल्या डॉक्टरसोबत घडला चक्रावून टाकणारा प्रकार

महाराष्ट्र ऐवजी मध्य प्रदेशमधून कार घेतल्यास, RTO नोंदणी कर किमान दोन ते तीन लाख रुपयांनी कमी लागेल असं दोन जणांनी सांगितलं.
३ लाखांचा RTO टॅक्स वाचवायला गेलेल्या डॉक्टरसोबत घडला चक्रावून टाकणारा प्रकार
NagpurSaam TV

नागपूर : नागपूरमधील (Nagpur) सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील एका डॉक्टरांना मध्यप्रदेशातून स्वस्तात नवीन कार मिळवून देण्याचं आमिष दाखवत २ जणांनी तब्बल ११ लाखाला गंडा घातला आहे. लक्झरी कार स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी ही फसवणूक केली असून, या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेश राज्यात परिवहन कर (Tax) कमी आहे. तिथून कार खरेदी केल्यास किमान दोन लाखांची बचत होईल, अशी बतावणी करून आरोपींनी डॉक्टरची फसवणूक केली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी डॉक्टर धनंजय सेलूकर हे स्पेशालिटी रुग्णालयात युरोलॉजी विभाग प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची आयुष अग्रवाल आणि पंकज अग्रवाल यांच्या सोबत भेट झाली यावेळी डॉक्टर सेलूकर यांनी आपण नवीन कार घेणार असल्याचे त्यांना सांगितल्यावर अग्रवाल यांनी महाराष्ट्र ऐवजी मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) कार घेतल्यास, RTO नोंदणी कर किमान २ ते ३ लाख रुपयांनी कमी लागेल असं सांगितलं. त्यामुळे डॉक्टरांनी मध्यप्रदेशातून कार विकत घेण्याची तयारी दर्शवली. कार बुक करण्यासाठी डॉक्टरांनी ११ लाख १२ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात वळते केले. मात्र, आरोपींनी केवळ ५० हजार रुपयेचं कार शो-रूम मध्ये भरून उर्वरित रक्कम लंपास केल्याचं स्पष्ट होताचं त्यांनी थेट अजनी पोलीस ठाण्यात (Ajni police station) फसवणूक करणाऱ्या आरोपीं विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

डॉक्टरला होती कार मिळण्याची प्रतीक्षा -

Nagpur
यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

कार बुक करण्यासाठी ११ लाख १२ हजार रुपये बुकिंग अमाउंट जमा केल्यानंतर लवकर कारची डिलिव्हरी मिळेल अशी अपेक्षा डॉक्टरांना होती. मात्र, कार मिळण्यास उशीर होत आल्याने त्यांनी कार शोरूममध्ये चौकशी केली. तेव्हा केवळ ५० हजार रुपयेचं बुकिंग अमाउंट जमा झाले असल्याचं सांगितलं, त्यानंतर त्यांनी मित्रांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना स्वतःची फसवणूक झाल्याचं समजलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.