Wardha: अतिक्रमणाची जागा स्वत:ची भासवत मोबाईल कंपनीला लावला कोटीचा चुना

नियमबाह्य गर्भपातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडवलेल्या कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी अतिक्रमण केलेली जागा आपली असल्याचे भासवून एका मोबाईल कंपनीला कोटीचा चुना लावल्याचे समोर आलं आहे. या
Mobile Tower
Mobile TowerSaam TV

सुरेन्द्र रामटेके -

वर्धा : अवैध गर्भपाताचा (Illegal Abortion) अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटल (Kadam Hospital) मधील नियमबाह्य गर्भपातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच याच कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अतिक्रमण केलेली जागा आपली असल्याचे भासवून एका मोबाईल कंपनीला कोटीचा चुना लावल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी अद्यापही टॉवर कंपनीकडून (Mobile Tower Company) पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी आर्वी नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान हे वास्तव उलगडले आहे.

आर्वी नगरपालिका प्रशासनाने (Arvi Municipal Administration) कदम हॉस्पिटलच्या संचालकांनी अतिक्रमण केले का याची शहानिशा केली याच शहानिशा दरम्यान अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या कदम कुटुंबीयांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि याच अतिक्रमण जागेवर सुरक्षा भिंत बांधल्याने पुढे आले त्यानंतर प्रभारी मुख्य अधिकारी विजय देवळीकर यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमित जागेवरील सुमारे 25 वर्ष जुनी कदम हॉस्पिटलची सुरक्षा भिंत जेसीपी च्या साह्याने पाडली.

Mobile Tower
सरकारी कार्यालयांमध्ये Mobile वापरावर बंदी? मोबाईल वापराबाबत हायकोर्टाची नियमावली

अतिक्रमण मोहीम राबविली जात असताना सुरक्षा भिंतीच्या आत एक टॉवर असल्याचे पुढे आले अधिकाऱ्यांनी यांची माहिती घेतल्यावर हे टॉवर आर्वी नगरपालिकेच्या खुल्या जागेवर असल्याचे पुढे आले शिवाय त्यावर पालिकेचा कर थकीत असल्याने हे टॉवर पालिका कर्मचाऱ्यांनी सील केले आहे .एकूणच आर्वी नगरपालिकेच्या अतिक्रमण केलेल्या जागेची खोटी बतावणी करून कदम कुटुंबीयांनी टॉवर कंपनीची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे तर आता सदर टावर कंपनीचे प्रतिनिधी पोलीस तक्रार नोंदवितात काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com