कॉम्प्युटर कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक

कॉम्प्युटर कोर्स च्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी क्लासेसच्या दोन महिला संचालकांवर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कॉम्प्युटर कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक
कॉम्प्युटर कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूकSaamTv

बुलढाणा : कॉम्प्युटर कोर्स च्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्याचे अमिष दाखवत बुलडाण्यातील विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी क्लासेसच्या संचालक असलेल्या दोन महिलांवर बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Fraud with students under name of computer course

हे देखील पहा -

'स्मार्ट व्हॅल्यू क्लास नाशिक' या क्लासच्या व्यवस्थापकांनी बुलढाण्यात आपले ऑफिस उघडून कॉम्प्युटर क्लास घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे सांगून या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय व खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळणार असल्याचे अमिष दाखवत 15 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 18 हजार रुपये गोळा केले आणि दीड वर्ष उलटूनही क्लास सुरूच झाले नाहीत.

कॉम्प्युटर कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक
चंद्रपुरमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा !

त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी संबंधित संचालकांना संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे बुलढाणा शहरासह तालुक्यातील 15 विद्यार्थ्यांनी लातूर व नांदेड येथील दोन महिला संचालकांविरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील पोलीस तपासात या स्मार्ट व्हॅल्यू क्लासेस च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com