Bhandara : किरकोळ वादातून कैद्यांमध्ये तूफान राडा; ८ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

Freestyle Fight among inmates over minor dispute in Bhandara District Jail : या तिघांच्या भांडणात इतर ५ आरोपीही सामील झाले. यावेळी त्यांच्यात मोठी हाणामारी झाली.
Freestyle Fight among inmates over minor dispute in Bhandara District  Jail
Freestyle Fight among inmates over minor dispute in Bhandara District Jailअभिजीत घोरमारे

भंडारा: कारागृहातील उपहार गृहात खरेदी दरम्यान झालेल्या क्षुल्लक वादातून कैद्यांच्या दोन गटात तूफान मारहाण (Fight) झाल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्हा कारागृहात घडली आहे. याप्रकरणी जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांच्या तक्रारीवरुन भंडारा शहर पोलिसात ८ कैद्यांविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Freestyle Fight among inmates over minor dispute; Crime filed against 8 prisoners in Bhandara District Jail)

हे देखील पाहा -

श्याम उर्फ पिटी चाचेरे वय ४० वर्ष, शाहरुख रज्जाक शेख वय ३०, शुभम चव्हाण वय ३२ वर्ष, गौतम चव्हाण वय २७ वर्ष, विजय तरोने वय ३० वर्ष, प्रथम मेश्राम वय २७ वर्ष, मुकेश रावते वय ३२ वर्ष इमरान शेख वय ३३ वर्ष असे गुन्हा नोंद झालेल्या कैद्याचे नावे आहे. विशेष म्हणजे या मारहाणीत मोक्काच्या आरोपींचा समावेश आहे. भंडारा कारागृहातील कारागृह सुभेदार न्यायाधीन कैद्यांना कारागृहातील उपहार गृहात वस्तू खरेदी करण्यासाठी घेऊन येत असतांना यातील मोक्कामधील आरोपी कैदी श्याम उर्फ पिटी चाचेरे आणि शाहरुख रज्जाक शेख याचे दुसऱ्या मोक्कातील आरोपी कैदी शुभम चव्हाण याच्यासोबत भांडण झाले. या तिघांच्या भांडणात इतर ५ आरोपीही सामील झाले. यावेळी त्यांच्यात मोठी हाणामारी झाली. त्यांनी लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण सुरु केली.

Freestyle Fight among inmates over minor dispute in Bhandara District  Jail
भयंकर! ३ सख्ख्या बहिणींसह २ चिमुकल्यांची निर्घृण हत्या; विहिरीत आढळले मृतदेह

लागलीच कारागृहातील पोलीस धावून आले आणि दोन्ही गटातील भांडण सोडवले. त्यानंतर जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान भंडारा जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या तक्रारीवरुन ८ आरोपी कैद्यांविरुद्ध भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास भंडारा शहर पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com