जालना: पैशांसाठी 'त्या' फळविक्रेत्याची निर्घृण हत्या!

पैश्याच्या देवाणघेवाणीतून भरत मुजमुले या तरुणांची हत्या
Jalna Crime News
Jalna Crime Newsलक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना : जिल्ह्यात 25 वर्षीय फळविक्रेत्याची हत्या झाल्याचा प्रकार सकाळी शहरातली डबलजीन परिसरात उघडकीस आला होता. भरत मुजमुले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत या प्रकरणी तपास सुरु केला असता, पैशाच्या देवाण घेवणीतून या प्रकरणी शहरातील एमपीडीएअंतर्गत एक वर्ष स्थानबद्ध असलेला व काही दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटून आलेल्या ऋषी भगवान जाधव आणि आकाश लुंगे आणि इतर एका आरोपीने मिळून भरत यांच्यावर चाकूने वार करून हा त्यांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Jalna Crime News In Marathi)

Jalna Crime News
Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला

या प्रकरणी ऋषी आणि आकाश या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसानी ताब्यात घेतले. मात्र ताब्यात घेण्यापूर्वीच ऋषी याने विषारी औषध प्राशन केलेले असल्याचं संशय पोलिसांना आल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याचाही प्रकृती चिंताजनक नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

या प्रकरणी हत्या झालेल्या भरत मुजमुले यांच्या भावाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिसात तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आलाअसून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Jalna News In Marathi)

हे देखील पहा-

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com