सोलापुरकरांनाे! आता सायकललाच बनवा साेबती; काॅंग्रेसचे आंदाेलन
Solapur

सोलापुरकरांनाे! आता सायकललाच बनवा साेबती; काॅंग्रेसचे आंदाेलन

साेलापूर : काेविड 19 मुळे आधीच अनेकांवर बेराेजगारीचे संकट आले आहे. वाढत्या महागामुळे नागरिक मेटाकुटीला आले असून त्यातच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार वाढत्या इंधन दरवाढीवर काेणत्या उपाययाेजना करण्यात नसल्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या आज (गुरुवार) सायकल आणि बैलगाडी रॅली काढण्यात आली. ही रॅली काँग्रेस भवन ते डफरीन चौक अशी काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदवला हाेता. (fuel-price-increased-solapur-congress-agitation-narendra-government-marathi-news)

सध्या साेलापूर शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांपेक्षा जादा झाले आहेत. वारंवार वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने आता नागरिकांना सायकल हाच पर्याय असल्याचं मत व्यक्त करत केंद्र सरकारच्या धाेरणाचा निषेध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन केलं होतं.

ही सायकल रॅली काँग्रेस भवन ते डफरीन चौक अशी काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Solapur
आईचा खून करुन काळीज खाणा-यास न्यायालयाने सुनावली फाशी
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com