Gadchiroli News : दोन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी संजयला पत्नीसह अटक

Gadchiroli News : दोन कोटींचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी संजयला पत्नीसह अटक
Gadchiroli News
Gadchiroli NewsSaam tv

मंगेश बांदेकर

गडचिरोली : नक्षल चळवळीत गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य नक्षल (Gadchiroli) नेता संजय राव उर्फ दीपक याला पकडून देण्यासाठी दोन कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. अशा नक्षलवादीला पत्नीसह तेलंगणा (Police) पोलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

Gadchiroli News
Mumbai-Goa Higway Accident : कोकणात जाणाऱ्या एसटी बसला अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू १९ जण जखमी

दीपक हा महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथील मूळ रहिवासी असून कश्मीरमध्ये बीटेकच शिक्षण घेतल्यानंतर तो महाराष्ट्रात परतला. त्यानंतर नक्षल चळवळीत तो सामील झाला. महाराष्ट्रासह काही राज्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दरम्यान पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे २०१५ मध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन जणांना अटक झाली होती. त्यावेळी संजय तिथून निसटला होता. नक्षल चळवळीशी संबंधित काही साहित्य, शस्त्र आणि रोख रक्कम त्या ठिकाणी सापडली होती. 

Gadchiroli News
Car Accident: १०० फूट खोल दरीत कोसळली कार; चौघांचा मृत्यू, पर्यटनाला जाताना अपघात

सध्या संजयकडे कोकणसह पश्चिम घाटात नक्षल चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आणि पश्चिम घाट विशेष क्षेञ समितीचा तो सदस्य होता. नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठ्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या संजयवर महाराष्ट्र सरकारने ५० लाखाचे तर इतर राज्याचे मिळुन दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र तेलंगणा पोलिसांनी संजयसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली आहे. संजयची पत्नीही नक्षल असुन तिलाही बंगलुर येथून पोलीसानी अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com