Gadchiroli News: न्यायाधीशांशी हुज्जत घालणे पडले महागात; पोलीस निरीक्षकांचं निलंबन

Suspension Of Police Inspector In Charmoshi: चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल पवार यांना पोलीस निरीक्षकांकडून बेदम मारहाण झाली होती.
Gadchiroli News
Gadchiroli NewsSaamtv

मंगेश भांडेकर, प्रतिनिधी...

Gadchiroli News: आपल्याविरुद्ध निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावरून न्यायाधीशांच्या घरी जाऊन हुज्जत घालणे पोलिस निरिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. चामोर्शी येथील पोलीस निरीक्षक असलेले राजेश खांडवे यांना गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी निलंबित केले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू....

Gadchiroli News
Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण; अनेक मागण्यासांठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान माजी सभापती अतुल पवार यांना पोलीस निरीक्षकांकडून बेदम मारहाण झाली होती. या प्रकरणी चामोर्शी येथे राजेश खांडवे यांच्याविरुद्ध मोठे आंदोलन झाले. (Latest Marathi News)

यासंदर्भात अतुल पवार यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्याविरुद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नाही. या विरोधात अतुल पवार यांनी चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली.

Gadchiroli News
Nashik Municipal Corporation Job Vacancy 2023: नाशिककरांसाठी खुशखबर, महापालिकेत ७०६ पदांसाठी निघणार नोकरभरतीची जाहिरात

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम 294, 324, 326 अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश 20 मे रोजी दिले होते. या प्रकरणी राजेश खांडवे गुरुवारी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर पोचून त्यांच्याशी हुज्जत घातली.

न्यायाधीशांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना अवगत करून गडचिरोली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत राजेश खांडवे यांना निलंबित केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com