गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या टीमला 51 लाखांचं बक्षीस जाहीर

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकित पोलिसांच्या सी 60 पथकाने अतुलनीय शौर्य दाखवून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या टीमला 51 लाखांचं बक्षीस जाहीर
गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या टीमला 51 लाखांचं बक्षीस जाहीर Saam TV

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील कोलगुट-ग्यारापल्ली जंगलात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांच्या सी 60 कमांडो पथकाच्या टीमला जिल्हा नियोजन फंडातून 51 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांना तसे निर्देश दिलेले आहेत.

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकित पोलिसांच्या सी 60 पथकाने अतुलनीय शौर्य दाखवून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत 4 पोलीस जवान देखील जखमी झाले होते. पालकमंत्री शिंदे यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन या जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जाऊन सी 60 पथकातील पोलिसांची देखील भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या टीमला 51 लाखांचं बक्षीस जाहीर
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील घनिष्ठ संबंधावरून टीका टिपणी

यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल आणि पोलीस महासंचालक संदीप पाटील यांच्याकडून या चकमकीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या जवानांचे अभिनंदन करण्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून त्यांना 51 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांचे अभिनंदन करण्यासोबतच त्यांना हे विशेष बक्षीस देत असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

जिल्ह्यातील नक्षल पीडित बांधवांसाठी विशेष तरतूद करून उपाययोजना करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले. या जिल्ह्याची एक मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख बदलून टाकून इथल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापुढेही शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com