Gadchiroli: प्रसुतीसाठी गरोदर मातेचा जीवघेणा प्रवास...

एका गरोदर मातेला प्रसुतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणताना गावकऱ्यांना त्या गरोदर मातेसह आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.
Gadchiroli: प्रसुतीसाठी गरोदर मातेचा जीवघेणा प्रवास...
Gadchiroli: प्रसुतीसाठी गरोदर मातेचा जीवघेणा प्रवास...संजय तुमराम

संजय तुमराम

गडचिरोली: गडचिरोली Gachiroli जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गरोदर मातांचा Pregnant Woman जीव अजूनही धोक्यातच आहे. एका गरोदर मातेला प्रसुतीसाठी Delivery प्राथमिक आरोग्य केंद्रात आणताना गावकऱ्यांना त्या गरोदर मातेसह आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र Health Center गाठावे लागले.

हे देखील पहा-

चामोर्शी Chamorshi तालुक्यातील वेंगनूर गाव कन्नमवार जलाशयाच्या दुसऱ्या टोकावर आहे. इथल्या सुमित्रा नरोटे या गरोदर महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. गावात दवाखाना नसल्याने प्रसुतीसाठी 9 किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

Gadchiroli: प्रसुतीसाठी गरोदर मातेचा जीवघेणा प्रवास...
Solapur: महापालिकेमार्फत केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा

मात्र या मार्गावर मोठे नाले आणि नाल्यात साचलेले कन्नमवार जलाशयाचे पाणी, यामुळे बोटीच्या साहाय्याने रात्रीचा जलप्रवास शक्य नव्हता. त्या गरोदर मातेला रात्रभर वेदना सहन करत प्रतीक्षा करावी लागली. पहाटे गावकऱ्यांनी कसाबसा 9 किमी प्रवास करून प्रशासनाने दिलेल्या बोटीच्या साहाय्याने कन्नमवार जलाशय ओलांडले. आणि रुग्णवाहितकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी गाठले. सध्या तिच्यावर रेगडी येथे उपचार सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पक्के रस्ते, नदी-नाल्यावर पूल नसल्याने तसेच वेळेवर रुग्णवाहिका Ambulance उपलब्ध होत नसल्याने उपचाराअभावी अनेक गरोदर मातांना जीव गमवावा लागला आहे.

प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रेगडी ते वेंगनूर रस्त्यावरील नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे. वेंगनूर आणि बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेली काही गावे तब्बल पाच महिने "नॉट रिचेबल" राहतात हे विशेष.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com