देवा सारखं धावून आलात भाऊ! पूरातून 17 जणांचा वाचला जीव
akola citizens rescued

देवा सारखं धावून आलात भाऊ! पूरातून 17 जणांचा वाचला जीव

अकोला : अकोला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला हाेता. पावसामुळे नदी काठी राहणा-या भागातील रहिवाशांचे खूप हाल झाले. दरम्यान पूराच्या पाण्यात अडकलेल्या 17 नागरिकांना गाडगे बाबा आपत्कालीन पथकाने सुखरूप बाहेर काढले. (gadge-baba-sanstha-rescued-17-citizens-akola-rain-updates-sml80)

या सर्व नागरिकांनी गाडगे बाबा आपत्कालीन पथकाच्या सदस्यांचे आभार मानले. आज तुम्ही आला नसता तर आमचे काय झाले असते देवासच ठाऊक अशी भावना व्यक्त करताना नागरिकांच्या डाेळ्यांतून अश्रु तरळले.

अकोल्यातील बार्शीटाकळी रस्त्यावरील चंद्रपुर येथील कवादे कुटुंबातील तीन, बार्शीटाकळी येथील खोलेश्वर मंदीरा समोरील विद्रुपा नदीपात्रातील असलेल्या स्मशानभूमीत अडकलेल्या आई वडील आणी मुलासह तिंघांना तसेच स्मशानभूमीत राहणारे पिराजी एल्लपा कोंडेवार वय (40), पत्नी राधाबाई पिराजी कोंडेवार वय (35) मुलगा अर्जुन पिराजी कोंडेवार वय (12) रा.बीलोली जिल्हा नांदेड यांना सुखरुप बाहेर काढले. एकूण 17 नागरिकांना रेस्क्यु केले आहे akola citizens rescued.

akola citizens rescued
सिंधुदुर्ग- रत्नागिरी : पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद

हे रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com