परभणीत घरोघरी उत्साहाच्या वातावरणात श्रींची स्थापना

वाद्याविनाच गणपतीचे आगमन
परभणीत घरोघरी उत्साहाच्या वातावरणात श्रींची स्थापना
परभणीत घरोघरी उत्साहाच्या वातावरणात श्रींची स्थापनाराजेश काटकर

परभणी - आज पासून गणरायाची Ganpati स्थापना मोठ्या उत्साहात झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लहानापासून थोरांपर्यंत मोठी गर्दी दिसून आली. प्रथमच कुठल्याही वाद्यविना गणेशाचे आगमन घरोघरी करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याहीवर्षी अनेक मंडळांनी श्रींची स्थापना केली नाही. प्रशासनाने देखिल आपल्या घरीच गणपतीची स्थापना करावी असे आवाहन केले होते यास जिल्ह्यातील मंडळांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळत आहे.

हे देखील पहा -

गणेश मूर्ती व पूजेसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडवत साहित्य खरेदी केले. महापालिका पोलीस प्रशासनाने देखील गर्दी होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत विना मास्क गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडविला.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com