सुखकर्ता दुःख दूर करेल; सांगलीकरांना अपेक्षा

सुखकर्ता दुःख दूर करेल; सांगलीकरांना अपेक्षा
sangli ganesh festival

सांगली : गणपती बाप्पा माेरया मंगलमुर्ती माेरया या जयघाेषात सांगलीकर आपल्या लाडक्या बाप्पास घरी नेत आहेत. आज गणेश चुतर्थी असल्याने ठिकठिकाणी बाप्पांचे धुमधडाक्यात स्वागत करीत आहेत. काेविड १९ आणि महापूराचे विघ्न पुन्हा नकाे अशी प्रार्थना सांगलीकर भाविक करीत आहेत. ganesh-chaturthi-sangli-ganeshotsav-2021-sml80

सांगली जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवावर काेविड १९ बरोबर महापुराचे सावट आहे. गत दाेन वर्षांपासून सांगलीकरांना गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. यंदा समस्त सांगलीकरांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि काही प्रमाणात धुम धडाक्यात गणेशोत्सव साजरा करत येईल अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना आणि पुन्हा महापुर या दुहेरी संकटात सांगलीकर यंदा सापडले. तरीही घरोघरी बाप्पांना विराजमान करून सुखकर्ता दुःख दूर करतील ही अपेक्षा बाळगून आहेत.

sangli ganesh festival
Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

सांगलीसह राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवावर sangli ganesh festival कोरोनाचे सावट असल्याने यंदा देखील सर्वत्र माेठ माेठी मंडळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करीत आहेत. अनेक मंडळांनी बाप्पाचे आॅनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com