जालन्यातील तरुणाने कुवैत मध्ये केली गणरायाची प्रतिष्ठापणा!

इराकचा बॉर्डर वर असलेल्या मेडील कॅम्प मध्ये बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.
जालन्यातील तरुणाने कुवैत मध्ये केली गणरायाची प्रतिष्ठापणा!
जालन्यातील तरुणाने कुवैत मध्ये केली गणरायाची प्रतिष्ठापणा!लक्ष्मण सोळुंखे

जालना : ज्या प्रमाणे महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो, त्याप्रमाणेच कुवैत मध्ये नोकरीसाठी गेलेल्या जालना जिल्ह्यातील माणिक दासपुते या तरुणांच्या कॅम्प मध्येही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या तरुणांनी आज दुपारी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा केली असून बाप्पाच्या प्रतिष्ठापणेवेळी महाराष्ट्रातील तरुणा बरोबरच कुवैत मध्ये राहणाऱ्या केरळ राज्यातील त्याच्या मित्रांनी ही या उत्सवात सहभाग घेत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.(Ganesh Festival celebrated in Kuwait)

हे देखील पहा-

बाप्पाची मनोभावे आरती करून लाडक्या बाप्पाचं स्वागत या तरुणांनी केलं. कुवैत मध्ये हे तरुण मेडिकल कॅम्प च्या माध्यमातून रुग्णाची सेवा करत आहे, इराक पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑइल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचऱ्याची सेवा आरोग्य कॅम्पच्या माध्यमातून हे तरुण करत आहेत.

जालन्यातील तरुणाने कुवैत मध्ये केली गणरायाची प्रतिष्ठापणा!
हात काय, पाय सुद्धा लावेन; PI संजय निकमांची पत्रकारांना धक्काबुक्की (पहा व्हिडीओ)

महाराष्ट्रापासून आणि कुटूंबापासून दूर असलेल्या या तरुणांनी आपल्या कॅम्प च्या रूम मध्ये गणपतीची गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com