गणपती विसर्जनाला गालबोट; महाराष्ट्रात विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या घटनेत २० जणांचा मृत्यू

राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या गणेशोत्सवाला गालबोट देखील लागले आहे.
ganesh visarjan
ganesh visarjan saam tv

Ganesh Visarjan News : अनंत चतुर्दशी दिवशी शुक्रवारी राज्यभारत गणपती विसर्जनाच्या भव्य मिरवणुकांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या गणेशोत्सवाला (Ganesh Festival) गालबोट देखील लागले आहे. राज्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करताना एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १४ जणांचा मृत्यू शनिवारी गणेश मूर्ती विसर्जन करताना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ganesh visarjan
Yavatmal: गणेश विसर्जनाला गालबोट! दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

राज्यातील विविध भागात गणेशमूर्ती विसर्जन करताना भक्तांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर अशाच घटनेत देवळी येथेही एकाचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर यवतमाळ जिल्ह्यात देखील तलावात मूर्ती विसर्जन करताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाला.

अहमदनगर जिल्ह्यातही दोन वेगवेगळ्या घटनेत सुपा आणि बेलवंडी येथे दोघांचा बुडून मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्रातील जळगावातही चाळीसगाव आणि जामनेर येथेही प्रत्येकी एक मृत्यू झाला. पुणे, धुळे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले.

ganesh visarjan
हरियाणात मोठी दुर्घटना! गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून ६ जणांचा मृत्यू; अनेकांना रुग्णालयात केले दाखल

नागपूर शहरातील सक्करदरा येथे देखील गणेश विसर्जनाच्यावेळी चार जणांचा मृत्यू झाला. ठाण्यात मुसळधार पावसामुळे कोलबाड परिसरात गणेश मंडळावर झाड कोसळून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विसर्जनाच्या आधी गणेशमूर्तीची आरती सुरू असताना मंडपावर एक मोठं झाड कोसळलं. या अपघातात राजश्री वालावलकर ही महिला गंभीर जखमी झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत उरण नाका येथील वडघर विसर्जन घाटावर शॉक लागून ११ जण जखमी झाले आहे. शुक्रवारी, सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या ११ भाविकांना हा वीजेचा शॉक लागला आहे. त्यानंतर या भाविकांना रुग्णालयात दाखल केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com