मी वाईट काम केलेले नाही, गणराय संकट दूर करेल : अनिल परब
anil parab

मी वाईट काम केलेले नाही, गणराय संकट दूर करेल : अनिल परब

सिंधुदुर्ग : मी दरवषी येतो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. मला चांगले काम करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करीत असताे. मी कोणतेही वाईट काम केलेले नाही त्यामुळे गणराय माझ्यावर आलेले संकट नक्कीच दूर करेल असा विश्वास मला असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब anil parab यांनी नमूद केले.

मंत्री अनिल परब हे कणकवली तालुक्यातील हरकुळ या त्यांच्या मूळ गावी लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी आज साध्या पध्दतीने बाप्पाचे स्वागत केले. त्यावेळी मंत्री परब म्हणाले मी दरवर्षीच गणरायाची आराधना करत असतो. कोकणातील प्रत्येक माणूस गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी उत्सव साजरा करण्यासाठी घरी आपल्या गावी येत असताे. लाडक्या बाप्पाकडून मला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळते.

anil parab
कोकण रेल्वेचेही खासगीकरणं; ६९ स्थानकांचा ताबा ठेकेदारास?

मी दरवषी येतो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो मला चांगले काम करण्याची शक्ती दे बुद्धी दे, मला एक नक्की माहिती आहे की मी कोणतही वाईट काम केलेले नाही त्यामुळे गणराय माझ्यावर आलेली संकट नक्कीच दूर करेल असा मला विश्वास आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com